1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified गुरूवार, 2 एप्रिल 2020 (08:01 IST)

उद्धव ठाकरे यांच्याकडे एसटी कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे विमा संरक्षण देण्याची मागणी

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा खंडीत करण्यात आल्या आहेत. या अत्यावश्यक सेवेमध्ये एसटी महामंडळाचाही समावेश आहे.

त्यामुळे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही सेवा बजावणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे विमा संरक्षण देण्याची मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.