मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By

Coronavirus : १०० कोटींची वैद्यकीय उपरणं पुरवण्यासाठी TikTok चा पुढाकार

कोरोनाशी लढण्यासाठी शक्य तितकी आर्थिक मदत देशाच्या कानाकोपऱ्यातून येत आहे. अशातच प्रसिद्ध टिक टॉक अ‍ॅपने देखील मदतीचा हात पुढे केला आहे. टिक टॉकने भारताला १०० कोटींची वैद्यकीय उपकरणं पुरवली आहेत. यामध्ये डॉक्टर आणि फ्रंट लाईन मेडिकल स्टाफच्या सुरक्षेसाठी मेडिकल प्रोटेक्टिव्ह सूट आणि मास्क पुरवण्यात आले आहेत.
टिक टॉकने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याची माहिती दिली आहे. केंद्रीय वस्त्रोउद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी देखील एक व्हिडिओ शेअर करत टिक टॉकने देऊ केलेल्या मदतीचे आभार मानले आहेत.