या काळात तंबाखू आणि दारुचे सेवनही करु नका
देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे घरात बसले आहे तरी या काळात घरी बसून देखील तंबाखू आणि दारुचे सेवन करु नका कारण ते तुम्हाला दिलासा देण्याऐवजी तुमची प्रकृती बिघडवू शकते. यामुळे तुमची प्रतिकारक्षक्ती कमी होण्याचा धोका आहे, अशा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.
‘Minding our minds during the COVID-19 pandemic’ नावाची एक पुस्तिका सरकारने ऑनलाईन उपलब्ध करुन दिली आहे. यात म्हटलंय की या काळात नकारात्मक भावनांपासून स्वतःला दूर ठेवा, आवडची गाणी ऐका, पुस्तकं वाचा, मनोरंजनाचे कार्यक्रम बघा, स्वत:चे छंद जपा. ही वेळ आहे पुन्हा आपल्या आवडीचे कामं करण्याची.
यात सोशल डिस्टंसिंगमुळे निर्माण होत असलेल्या ताणावर कशा प्रकारे मात करावी हे सांगण्यात आलं आहे. तसेच कोरोनाग्रस्त लोकांबद्दल चुकीचं मत तयार करु नका असे आवाहन करण्यात आलं आहे. कारण आजारातून बरा झाल्यावर त्यासोबत दुर्रव्यवहारमुळे त्याला ताण येऊ शकतं.
तसेच करोनाची लागण झाली असल्यास न घबारता डॉक्टरांनी सांगितलेली औषध वेळेवर घ्या आणि स्वतःला आयसोलेशनमध्ये टाकून घ्या. आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आणि फोनवर लोकांशी संवाद साधा. जर नकारात्मक भावना उत्पन्न होत असतील तर फॅमिली डॉक्टरांना, मानसोपचार तज्ज्ञांना किंवा (080-46110007) या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा आणि सल्ला घ्या. अशा प्रकारे पुस्तकात सल्ले देण्यात आले आहेत.