शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By

केरळमध्ये डॉक्टरची चिठ्ठी दाखवा, दारू मिळवा

केरळमध्ये काही नागरिकांनी आत्महत्या केल्यानंतर अखेर केरळ सरकारने अशा नागरिकांसाठी महत्त्वाची भूमिका घेतली आहे. डॉक्टरांची चिठ्ठी दाखवल्यास दारु विकत घेता येईल, अशी घोषणा केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी केली आहे.
 
लॉकडाऊनमुळे केरळमध्ये सर्व दारुची दुकाने बंद करण्यात आले. मात्र, दारु मिळत नसल्याने अनेकांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दारुचे दुकान बंद झाले ही माहिती मिळाल्यावर कोल्लम शहराचा रहिवासी मुरलीधरन आचार्यला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. तर 34 वर्षीय नौषादने दारु नाही म्हणून शेविंग लोशन पिवून आत्महत्या केली. याशिवाय 7 जणांनी दारुचे दुकान बंद झाल्याने आत्महत्या केली.