शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 20 फेब्रुवारी 2020 (11:25 IST)

हिंगणघाट जळीतकांड आरोपीचा तुरुंगात आत्महत्येचा प्रयत्न

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाचा आरोपी विकेश नगराळे याने नागपूर कारागृहात आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बातमी आहे. बुधवारी विकेशने ब्लॅंकेटच्या चिंधीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती दिली जात आहे. मात्र कारगृह प्रशासनाने अद्याप या घटनेला दुजोरा दिलेला नाही.
 
सूत्रांप्रमाणे थंडीपासून बचावासाठी विकेशला ब्लँकेट देण्यात आले आहे. बुधवारी दुपारी त्याने ब्लँकेट फाडून त्याची एक चिंधी बराकीतील गजाला बांधली आणि ती गळ्यात अडकवून फास लावण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार तिथे तैनात असलेल्या सुरक्षारक्षकाच्या लक्षात आल्यावर वेळीच धाव घेत विकेशच्या गळ्याभोवतीचा फास ढिला केला गेला. नंतर त्याला कारागृहातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
आरोपी विकेशने 3 फेब्रुवारी रोजी हिंगणघाट येथे एका प्राध्यापक तरुणीवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात 8 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 10 फेब्रुवारी रोजी पीडित तरुणीचा मृत्यू झाला होता.