मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 31 मार्च 2020 (16:09 IST)

भारतात १५ एप्रिल ते १५ जून पर्यंत पूणपणे लॉकडाउनची ऑडिओ क्लिप फेक

Viral audio falsely claims WHO has recommended India lockdown from April 15 to June 15
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात 21 दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे परंतू सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्मवर आणि व्हॉट्सअॅपवर एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत असल्यामुळे अफवा पसरत आहे. ८ मिनिट आणि ३४ सेकंदाची ऑडिओ क्लिप शेअर केली जात आहे. ज्यात दोन व्यक्ती चर्चा करीत आहेत. यातील एक करोना व्हायरसमुळे देश 15 जून पर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.
 
या ऑडिओ क्लिपमध्ये स्वतः WHO, इंडिया डायरेक्टर सौरभ यांचा मित्र सांगणारा हा व्यक्ती हा दावा करीत आहे. सौरभ म्हणतोय, देशात १५ एप्रिल ते १५ जून २०२० पर्यंत देशभरात पूर्णपणे लॉकडाउन करण्यात येणार आहे. कारण WHO च्या माहितीनुसार, भारतात करोना व्हायरसची परिस्थिती खूप गंभीर आहे.
 
ही ऑडिओ क्लिप अनेक जण व्हॉट्सअॅपवर मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत. परंतू प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो (पीआयबी) फॅक्ट चेकने एक ट्विटच्या माध्यमातून या ऑ़डिओ क्लिपला खोटी आणि असामाजिक असल्याचे म्हटले आहे.
 
पीआयबी फॅक्ट चेक च्या माहितीनुसार, या क्लिपमध्ये लॉकडाउनवर झालेली चर्चा खोटी आहे. खोटी माहितीचा ऑडिओ सोशल मीडियावर धडाक्याने शेअर करण्यात येत आहे. तसेच प्रसार भारतीने भारतात या प्रकारचे असे कोणतेही पद नसल्याचे म्हटले. ज्याचा या क्लिपमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.