मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By डॉ. छाया मंगल मिश्र||
Last Updated : शुक्रवार, 27 मार्च 2020 (12:22 IST)

21 Days lock down : 21 नंबरचा जादू आणि महत्त्व जाणून घ्या

कोरोनापासून बचाव करण्यासाठी 21 दिवसांचा लॉक डाउन ह्यावरून 21 संख्येमुळे अनेक 21 आठवू लागले. हिंदी मोजणीत 20 नंतर 1 जोडल्यावर ही संख्या 20+1, ज्याला संस्कृत मध्ये एकविंशति, इंग्रजीत (ट्वेन्टी वन) आणि रोमन मध्ये (XX| ) लिहिले आहे. आपण ज्या शतकात राहतो ते देखील एकविसावे शतक आहे. 
 
भारत हा एक धार्मिक देश आहे. श्रावणात अजर-अमर अनंत अश्या भगवान महादेवाचे पूजनाचे महत्त्व आहे. महाकाळाच्या नगरात महादेवांच्या 21 पूजनाची पद्धत आहे. रुद्राक्ष हा निसर्गाने दिलेला एकमेव वरदान आहे. अर्थ, काम, मोक्षाच्या प्राप्तीसाठी लाभदायी मानला जातो. यापैकी 21 मुखी रुद्राक्षाला कुबेर रूप मानले गेले आहे. 
 
भगवान परशुरामाने 21 वेळा पृथ्वीवर अत्याचार करणाऱ्या देत्यांचा संहार करण्यासाठी आपले अमोघ परशू उचलले. जे त्यांना भगवान शंकरांकडून प्राप्त झाले होते. प्राचीन ग्रंथात असे वर्णन आहे की यमाच्या यमलोकाचे सुद्धा 21 विभाग केले आहे. व्रत कैवल्यसुद्धा 21 असतात. भारतीय परंपरेचे कोकिळा व्रत सुद्धा 21 वर्षातून एकदाच केले जातात. 
 
योग विज्ञानात 21 विशेष संख्या आहेत - 84 चा चौथा भाग.
आपण तीन मूळभूत नाड्यांचा साताने चक्रगुणाकार केल्याने 21 संख्या मिळते. हे संपूर्ण जग ही संपूर्ण सृष्टी 84 चक्राने निर्मित आहे. शारीरिक दृष्ट्या या संख्येचे भौतिक महत्त्व आहे. योग मार्गाचा काळही देखील 21 दिवसांचा आहे. शाम्भवी महामुद्राची वेळ देखील 21 मिनिट आहे. जैव विज्ञानात 21 प्रकारांचे अमिनो ऍसिड (आम्ल) असतात. बायबलामधील देवदूतांची संख्या देखील 21 आहे. टॅरो कार्डाच्या ज्योतिष प्रणालीत देखील 21 ही संख्या शुभ आणि परिपूर्ण मानली आहे.
 
आपल्या भारतीय संविधान मध्ये कायद्यानुसार 21 वर्षाचा माणूस लग्न करू शकतो. कोणत्याही मांगलिक कार्यात 11, 21, 51 अंकाला शुभ मानले गेले आहे. या संख्यांवरच सर्व व्यवहार आणि शुभ शगुन दिले जातात. हिंदी भाषेमध्ये एक लोकप्रिय म्हण आहे 21 होणे. याचा अर्थ सर्वश्रेष्ठ असणे. 21 मे रोजीच सुष्मिता सेन विश्वविजेती पदास जिंकणारी पहिली भारतीय सौंदर्यवती होती.
 
21 तोफांची सलामी देणे हा देशाचा सर्वोच्च सन्मान मानला जातो. कोणाला किती तोफांचा सलामी देण्यात येईल हे देखील नियमानुसार असते. ब्रिटिश सम्राटास 101, इतर राजांसाठी 21 ‍किंवा 31. त्यानंतर ब्रिटेनने ठरविले की आंतरराष्ट्रीय सलामी 21 तोफांची असायला हवी. अमेरिकेत सुद्धा 21 तोफ्याची सलामी दिली जाते. 
 
आपल्या भारतात प्रजासत्ताक दिन (15 ऑगस्ट), गणतंत्र दिन (26 जानेवारी), सैन्य दिवस (15 जानेवारी), शहीद दिन (30 जानेवारी). राष्ट्रपती भवनात इतर देशांच्या प्रमुखांच्या आगमनानंतर सलामी देऊन अभिवादन केले जाते. 21 तोफ्याची सलामी 2.25 सेकंदाच्या अंतराळाने डागल्या जातात. जेणे करून राष्ट्रगानाच्या पूर्ण 52 सेकंदात प्रत्येकी 3 फेऱ्यात सात तोफ्याचं सतत गोळीबार केलं जाऊ शकतं. 
 
जगात विद्यमान प्रत्येकी सूक्ष्म मुख्य वस्तू, अंक इत्यादीचं महत्त्व आहे. तसेच 21 गुणांची अनेक उदाहरणे आढळतात. हा एक विलक्षण योगायोग आहे की या अश्या आव्हानात्मक आणि संकटाच्या काळात आपल्या दृढनिश्चय आणि शुभ संकल्पाचा सुस्पष्ट परिचय देत आपल्या माननीय पंतप्रधान श्री मोदी यांनी लॉक डाउन साठी या 21 दिवसांच्या कालावधीची निवड केली आहे. जे वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टिकोनातून देखील योग्य असल्याचे म्हणायला हवे. 
 
चला मग आपण या आत्मविश्वासाने प्रतिज्ञा करू या की या शक्ती पूजनेच्या उत्सवापासून सुरू होणाऱ्या ह्या लॉक डाउन कालावधी आपल्याला "सर्वे संतू निरामया" चे यश प्रदान करेल आणि ते पूर्णता प्राप्त करेल.