ब्रोकोली गुणांचा खजिना....
ब्रोकोली ही लोकप्रिय भाजी नाही. बऱ्याच लोकांना ह्या बद्दल जास्त माहिती नाही. पण ब्रोकोली गुणांचा खजिना आहे. ह्यामध्ये प्रथिनं, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट, लोह, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी अजून इतर अनेक पौष्टिक पदार्थ भरपूर प्रमाणात आढळतात. जे शरीरातील साखरेची पातळी संतुलित ठेवतात. लोकांना ह्यांच्यामधील गुणांबद्दल पुरेशी माहिती नाही. आज आपणास ह्याचा गुणांची माहिती देत आहो. चला तर मग यांचा गुणांची माहिती घेऊ या..
ब्रोकोली दिसायला फुल कोबी सारखी असते. ब्रोकोलीची आपण कोशिंबीर, सूप किंवा भाजी बनवू शकता. बरेच जण ह्याला उकडून खातात.
ब्रोकोली खाण्याचे फायदे :
1 हृदयरोग रोखण्यासाठी -
ब्रोकोलीमध्ये केराटिनॉइड्स ल्युटीन आढळते. हे रक्त वाहिन्यांना निरोगी ठेवते. ह्याचे नियमित सेवन केल्यास हृदयविकाराचा झटका आणि इतर रोगांचा धोका कमी होतो. ह्यामधील पोटॅशियम क्लोरेस्टराँलची पातळी वाढू देत नाही.
2 कर्करोग होण्याची शक्यता कमी करते -
ब्रोकोलीचे सेवन केल्याने कर्करोगाचा धोकाही कमी होतो. ह्यात फायब्रोकेमिकल्स आढळतात. ब्रोकोलीमध्ये असलेले घटक शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतात.
3 उदासीनतेचा धोका टाळतो -
ब्रोकोलीमध्ये भरपूर प्रमाणात फॉलेट आढळते. जे मानसिक आरोग्यासाठी हे आवश्यक आहे.
4 प्रतिकारशक्ती वाढविण्यास उपयुक्त -
ह्यात व्हिटॅमिन सी आढळतो. व्हिटॅमिन सी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास आणि कुठलेही प्रकारांचे संसर्ग रोखण्यास मदत करते.
5 गरोदरपणात सेवन करणे फायदेशीर -
गरोदर महिलांनी नियमित ब्रोकोलीचे सेवन करावे. ह्यात असलेले घटक बाळांच्या आरोग्य आणि विकासासाठी फायदेशीर असून आईस अनेक प्रकारच्या संक्रमणापासून लांब ठेवतात.