शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: रविवार, 29 मार्च 2020 (13:05 IST)

आरोग्य टिप्स : कोरड्या खोकल्यावर घरघुती उपाय करुन बघा

बदलत्या हंगामाच्या आपल्या शरीरांवर प्रभाव पडत असतो. सर्दी पडसे तर हमखास होतोच. विशेषतः खोकला होणे ही एक सामान्य समस्या आहे. हे त्रासदायक असते. काही घरघुती उपाय करून आपण या त्रासांपासून मुक्त होऊ शकतो. 
 
आलं आणि मीठ
याच्या सेवनाने आपण कोरड्या खोकल्या पासून मुक्त होऊ शकता. या साठी 1 नग आलं घेऊन त्याला थोडंस मीठ लावून त्याचे सेवन करावे. या उपायामुळे आपला खोकलाही बरा होऊन घसा देखील स्वच्छ होईल. 
 
ज्येष्ठमध
ज्येष्ठमधाचा चहापण आपल्याला कोरड्या खोकल्यापासून मुक्ती मिळवून देऊ शकतो.  
 
हळदीचे दूध
कोरड्या खोकल्यापासून पूर्णपणे बरं होण्यासाठी हळदीचे दूध अत्यंत प्रभावी असते. रात्री झोपण्याच्या आधी ते घ्यावे.
 
कोमट पाणी
पिण्याच्या सवयीमुळे शरीरातील चयापचय दर वाढतो, त्यापेक्षा कोमटपाणी कोरडा खोकला दूर करण्यास प्रभावी आहे. दिवसांतून 3 वेळा कोमट पाणी प्यायल्याने खोकल्यावर त्वरित आराम मिळू शकतो.
 
वाफ घेणे
वाफ घेतल्याने आपणास द्रुत आणि प्रभावी परिणाम मिळतात. गरम पाण्याची वाफ घेणे हा एक सोपा आणि घरघुती उपाय आहे. आपण कधीही ते करू शकता. घश्यात होणारी खवं-खवं आणि थंडपणावर त्वरीत आराम होतो.