रविवार, 11 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 20 जुलै 2020 (20:17 IST)

कंगणाने बॉलिवूडला रामराम ठोकावा – करण जोहर

(kangna Ranaut should leave bollywood)
एका मुलाखती दरम्यान बॉलीवूडचा डॅडी अर्थात करण जोहर याने जर अभिनेत्री कंगणा राणावतला बॉलीवूडमध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागत असेल, तर तिने खुशाल बॉलीवूडला रामराम करावा, असे म्हटले आहे. सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडविरोधात आक्रमक झालेली कंगणा सध्या सोशल मीडियात कायम चर्चेत आहे. याच दरम्यान ती वारंवार बॉलीवूडवर आगपाखड करत असते.
 
सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येला जबाबदार धरत दिग्दर्शक करण जोहर, सलमान खान, एकता कपूर यांच्यावर सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका होत आहे. दरम्यान करण जोहरचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.