सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 20 जुलै 2020 (11:46 IST)

सुशांतच्या शेवटच्या सिनेमातील आणखी एक गाणं रिलीज

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याचा शेवटचा सिनेमा दिल बेचारा लवकरच प्रदर्शित होणार आहे. 24 जुलैला सिनेमा डिजिटली रिलीज होणार आहे. याआधी सिनेमातील गाणे रिलीज होत आहेत. 'दिल बेचारा टायटल ट्रॅक' आणि 'तारे गिन'नंतर आणखी एक गाणं रिलीज झालं आहे. 'खुलके जीने का' हे गाणं रिलीज झालं असून याच सुशांत आणि संजना सांघी यांची केमिस्ट्री दिसत आहे.

'खुलके जीने का' गाण्याचं शूटिंग पॅरिसमध्ये झाली होती. हे गाणं अरिजीत सिंह याने गायलं असून लिरिक्स अभिजीत भट्टाचार्या यांनी लिहिले आहेत.