सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 1 जुलै 2020 (08:17 IST)

'हे' दोन चित्रपट थिएटरमध्येच प्रदर्शित होणार

गेल्या तीन महिन्यांपासून थिएटरमध्ये एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनेक मोठ्या चित्रपटांच्या प्रदर्शनाचा तारखा पुढे ढकलाव्या लागल्या.  मात्र अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ आणि रणवीर सिंगचा ’83’ हे दोन चित्रपट थिएटरमध्येच प्रदर्शित होणार आहेत.

खुद्द INOX ने  ही महत्त्वाची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. 'लवकरच रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’आणि कबीर खान दिग्दर्शित  '83’ चित्रपट थिएटरमध्येच प्रदर्शित होतील. ' असं INOX ने म्हटलं आहे. 

रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’चित्रपट दिवाळीला तर कबीर खान दिग्दर्शित  '83’ चित्रपट ख्रिसमसच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं जात आहे.