शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 मे 2020 (12:36 IST)

दीपिका-रणवीरच्या घरी पाळणा हलणार ? दीपिकाच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण

बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असणारं जोडपं म्हणजे अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग. लॉकडाऊनच्या काळात ते घरीच असून सोशल मीडियावर सक्रिय असतात. पण हल्ली दीपिकाने केलेल्या एका पोस्टमुळे दोघांकडे गोड बातमी आहे का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
 
दीपिकाने नुकताच एक फोटो आपल्या इन्सटाग्रामवरुन शेअर केला आहे. या फोटोमध्ये एका डिशमध्ये तिखट-मीठ लावलेल्या कच्च्या कैरीच्या फोडी दिसत आहे. आणि या फोटोला कॅप्शन आहे “हे इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा सर्वोत्तम आहे. आजपर्यंत मला भेटलेल्या सर्व गोष्टींमध्ये ही सर्वोत्तम गोष्ट आहे,” असं दीपिकाने म्हटले आहे.
 
उन्हाळ्यात कच्ची कैरी अनेकांची पसंत असली तरी या फोटोचा काही चाहत्यांनी वेगळा अर्थ काढून काही गोड बातमी देणार का? असे थेट प्रश्न मांडले आहे.