शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: शनिवार, 28 मार्च 2020 (10:41 IST)

वाटली डाळ: चैत्र महिन्यात ही डाळ करायची प्रथा, जाणून घ्या सोपी कृती

साहित्य- 250 ग्राम (चणा) हरभरा डाळ, हिरव्या मिरच्या, आलं, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरे, हळद, तिखट, मीठ, हिंग, 1/2 किसलेली कैरी, 1/2 वाटी ताक किंवा दही, किसलेलं खोबरं, तेल, मोहऱ्या (फोडणीसाठी). 
 
कृती- हरभरा डाळ स्वच्छ धुऊन 4 -5 तास भिजत ठेवावी. त्यातले सर्व पाणी काढून त्याला मिक्सरच्या पात्रात डाळ, कैरी, आलं, जिरे, हिरव्या मिरच्या टाकून आणि गरजे पुरतं ताक टाकून वाटून घ्यावं. ही वाटलेली डाळ एका पात्रात काढून त्यात तिखट, मीठ, साखर (चवीला) टाकावे. 
कढईत फोडणीसाठी तेल गरम करून मोहऱ्या, हिंग घालावे. त्यात वाटलेली डाळ, हळद टाकून परतावी. झाकण ठेवून डाळीला वाफ द्यावी. डाळ मोकळी झाल्यावर खोबऱ्याचा बुरा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरम डाळ सर्व्ह करावी.