सोमवार, 21 नोव्हेंबर 2022
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified सोमवार, 6 जानेवारी 2020 (17:57 IST)

हिवाळ्यात मटारची ही रेसिपी बनवा

साहित्य :-
1 - 2 कप मटार दाणे
1 वाटी रवा
3 -4 हिरव्या मिरच्या
आलं
चवीपूर्ती मीठ
2 मोठे चमचे दही
1 छोटा चमचा बेकिंग सोडा
कोथिंबीर
1 वाटी बारीक चिरलेले टॉमेटो
 
कृती:
मटारचे दाणे, आलं, हिरव्या मिरच्या, एकत्र मिक्सर मध्ये वाटून घ्या. हे वाटण भांड्यात काढून त्यात रवा, दही, कोथिंबीर, मीठ घाला. मिसळून 10 -15 मिनिटे ठेवा. सारण घट्ट असल्यास त्यात लागत - लागत पाणी घाला. 1 छोटा चमचा बेकिंग सोडा घाला.
 
तव्यावर तेल टाकून त्यावर टॉमेटो घाला. त्यावर सारण घाला. झाकण ठेवा. मध्यम आचेवर ठेवा. त्या सारणावर तेल टाकून पलटून घ्या आणि परत झाकण ठेवा. 2 मिनिटं झाल्यावर काढून घ्या. गरमागरम मटार उत्तपे तयार. हे उत्तपे नारळाच्या चटणी बरोबर सर्व्ह करायचे.