सोमवार, 8 सप्टेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Updated : मंगळवार, 17 डिसेंबर 2019 (16:02 IST)

खमंग कडबोळी: चकली आवडणार्‍यांना हा स्वाद देखील रुचेल

khamang recipe
साहित्य:- 2 कप कडबोळी भाजणी, 4 चमचे तीळ, 1 चमचा हिंग, 4 चमचे लाल तिखट, मीठ चवीपूर्ती, तळण्यासाठी तेल.
कृती:- सर्वप्रथम एका पॅन मध्ये पाणी गरम करायला ठेवावे. पाण्यात 2 चमचे तेल टाकावे, हिंग, तीळ, लाल तिखट, चवीपूर्ती मीठ घालावे. पाणी उकळू द्यावे. पाणी चांगले उकळल्यावर त्यात कडबोळी भाजणी घालावी. सर्व मिश्रण मिक्स करावे. मध्यम आचेवर मिश्रण हलवावे. नंतर गॅस बंद करावा. मिश्रण 10 मिनिट झाकून ठेवावे. थंड झाल्यावर त्याला मळून घ्यावे. घट्ट गोळा तयार करावा. 1-1 इंचाचे गोळे तयार करावे. नंतर पोळ पाटावर चकलीप्रमाणे किंवा लडीप्रमाणे वळवून घ्यावे. नंतर ह्या कडबोळ्या मध्यम आचेवर तेलात तळून घ्यावे.