सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 4 ऑगस्ट 2020 (09:09 IST)

मुंबईत सर्व दुकाने उघडणार, लोकल मात्र बंदच

कोरोना व्हायरसच्या प्रार्दुभावामुळे कधी न थांबणाऱ्या मुंबईचा वेग देखील मंदावला होता. मात्र आता 5 ऑगस्टपासून मुंबईची सर्वच दुकाने सुरु करण्यात येत आहे. 
 
मार्च महिन्यात लॉकडाऊन लावल्यानंतर मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पहिल्यांदाच एवढे दिवस मुंबईतील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता अनलॉकच्या निर्णयाची अंमलबजावणी सरकारने सुरु केली आहे. आता सर्व दुकानांना उघडण्यास परवानगी देण्यात आलीय. 
 
5 ऑगस्टपासून सर्व दुकाने उघडणार असून जिम आणि योगा इन्स्टिट्यूट खुली करण्यासाठी मात्र काही नियमावली लागू करण्यात येणार आहे. मात्र मुंबईची जीवन वाहिनी असणारी लोकल मात्र अजुनही बंदच राहणार आहे. त्यामुळे लोकांना प्रवासासाठी त्रास सहन करावा लागणार आहे.