सोमवार, 1 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 12 सप्टेंबर 2020 (17:48 IST)

माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण, भाजपने सरकारविरोधात मोर्चा उघडला

retired naval officer was beaten in Mumbai
निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण केल्याच्या प्रकरणावरुन भाजपाने शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात जोरदार मोर्चा उघडला आहे.
 
व्हॉट्सअ‍ॅपवर आक्षेपार्ह व्यंगचित्र फॉरवर्ड केले म्हणून मदन शर्मा यांना मारहाण केल्याचा शिवसैनिकांवर आरोप आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारं एक कार्टून शेअर केल्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला.
 
शर्मा यांना मारहाण केल्याच्या प्रकरणात शिवसेनेचा शाखाप्रमुख कमलेश कदम आणि अन्य पाच जणांना अटक झाली होती. या सर्व आरोपींना शनिवारी जामीन मंजूर झाला.
 
दरम्यान मदन शर्मा यांची मुलगी आणि भाजपाचे नेते आंदोलन करत आरोपींविरोधात अजामीनपात्र गुन्हे नोंदवण्यात यावा अशी मागणी करत आहे. महाराष्ट्रात आम्हाला सुरक्षित वाटत नाही. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करुन फेरनिवडणुका झाल्या पाहिजेत असे मदन शर्मा यांचा मुलगा सनी शर्माने म्हटले आहे. 

 
 
कांदिवलीत राहणार्‍या मदन शर्मा यांना मारहाणीत चेहऱ्याला आणि डोळयाला गंभीर मार लागला आहे.