बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 सप्टेंबर 2020 (16:34 IST)

अशी आहे शिवसेनेच्या प्रवक्तेपदाची यादी

भाजपला वेळोवेळी सडेतोड उत्तर देणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मुख्य प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्यासह इतर नेत्यांची यादीही शिवसेनेने जाहीर केली आहे. यात खासदार अरविंद सावंत, परिवहन मंत्री अनिल परब, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार निलम गोर्‍हे यांची निवड करण्यात आली आहे.
 
महापौर किशोरी पेडणेकर, आमदार प्रताप सरनाईक, आमदार सुनिल प्रभू यांचीही प्रवक्ते म्हणून घोषणा शिवसेना मध्यवर्ती कार्यलकडून करण्यात आली आहे. यावेळी राज्यसभेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांचीही प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे.