शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 5 सप्टेंबर 2020 (09:32 IST)

शिवसेना कंगना राणौतला प्रत्युत्तर देणार, शिवसेना आमदाराने दिली माहिती

मुंबईविषयी बोलणाऱ्या अभिनेत्री कंगना राणौतला शिवसेनेकडून लवकरच प्रत्युत्तर दिले जाणार आहे. येत्या ९ सप्टेंबरला कंगना मुंबईत येणार आहे. त्यावेळी शिवसेना कंगना राणौतला नेहमीच्या स्टाईलने प्रत्युत्तर देईल. आपण बघत राहा, असा इशारा शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी दिला आहे.
 
कंगना राणौत हिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. यानंतर कंगनावर सर्व माध्यमांतून टीकेचा भडिमार सुरु आहे. मात्र, कंगनाने आपण या सगळ्या धमक्यांना भीक घालत नसल्याचे सांगितले. अनेकांनी मला मुंबईत परत न येण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे आता मी येत्या आठवड्यात ९ सप्टेंबर रोजी मुंबईत प्रवास करणार आहे. मुंबई एअरपोर्टला उतरण्याची वेळ मी तुम्हाला ठरली की सांगेन. कुणाच्या बापात हिंमत असेल तर मला रोखून दाखवा, असे ट्विट कंगनाने केले.