मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 25 ऑगस्ट 2020 (15:55 IST)

शिवसेनेच्या मंत्र्याने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

state politics
राज्यापुढे कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. कोरोनाच्या परिस्थितीत ही राज्य सरकार विरुद्ध भाजप असा सामना पाहण्यास मिळाला. भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर एकही टीकेची संधी सोडली नाही. परंतु, गेल्या सात महिन्याच्या कालखंडात पहिल्यांदाच शिवसेनेला नेते थेट विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचला आहे.
 
शिवसेनेचे मंत्री अनिल परब हे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले आहे. अनिल परब हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खास निकटवर्तीय आहे. अनिल परब हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
 
अनिल परब यांनी फडणवीस यांची भेट घेतली आहे. या बैठकीला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे सुद्धा उपस्थित होते.
 
आज विधिमंडळाचे कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. त्यासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार केल्याची  माहिती अनिल परब यांनी दिली. या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं परब  यांनी सांगितले आहे. परंतु, गेल्या सात महिन्याच्या कालखंडात सत्ताधारी पक्षाचे नेते आणि मंत्री हे थेट विरोधी पक्षाच्या नेत्याला भेटीला आल्यामुळे एकच चर्चा रंगली आहे.
 
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनीही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. खुद्द सुप्रिया सुळे यांनी आशिष शेलार हे भेटीला आले होते, याबद्दल माहिती आणि फोटो शेअर केला होता.