गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020 (21:16 IST)

‘तेजस’चा फर्स्ट लूक प्रदर्शित

Kangana Ranaut first look Tejas released
अभिनेत्री कंगना रणौतचा आगामी चित्रपट ‘तेजस’चा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कंगना भारतीय वायूदलातील पायलटची भूमिका साकारणार आहे. सर्वेश मेवारा या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. विकी कौशलच्या प्रसिद्ध ‘उरी- द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाचे निर्माते कंगनाच्या ‘तेजस’ची निर्मिती करत आहेत.
 
‘तेजस या चित्रपटात मी एअर फोर्स पायलटची भूमिका साकारणार आहे. देशाच्या साहसी एअरफोर्स पायलटची कथा या चित्रपटात दाखवण्यात येणार असून मी या चित्रपटाचा एक भाग आहे याचा मला अभिमान आहे’, असं म्हणत कंगनाने फर्स्ट लूक पोस्ट केला. येत्या डिसेंबर महिन्यात या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.