गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 26 ऑगस्ट 2020 (11:23 IST)

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका दोघांनी सोडली, दिसणार नवे चेहेरे

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील 12 वर्षांपासून भाग असलेली अभिनेत्री नेहा मेहता अर्थात 'अंजली भाभी' हा शो सोडत आहे. काही दिवसांपूर्वी याच मालिकेतील 'रोशन सिंह सोढी' ही व्यक्तीरेखा साकारणाऱ्या गुरुचरण सिंह यांनी शो सोडला. 
 
नेहा मेहता 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा शो दुसऱ्या प्रोजेक्टसाठी सोडत असल्याची माहिती आहे. तसंच नेहा मेहताच्या जागी अभिनेत्री सुनैना फौजदार 'अंजली भाभी'ची भूमिका साकारणार  आहे.  पुढील एपिसोडमध्ये'अंजली भाभी'च्या भूमिकेत दिसणाऱ्या सुनैनाने संतान, लेफ्ट राईट लेफ्ट, लागी तुझसे लगन, कुबूल है, एक रिश्ता साझेदारी का, बेलन वाली बहू यांसारख्या शोमध्ये काम केलं आहे. 
 
दुसरीकडे 'रोशन सिंह सोढी' ही व्यक्तीरेखा साकारणाऱ्या गुरुचरण सिंहनेही शो सोडल्यानंतर आता त्या जागी अभिनेता बलविंदर सिंह सुरी 'सोढी'ची भूमिका साकारणार आहे. बलविंदर सिंह सुरीने दिल तो पागल है, धमाल, साजन चले ससुराल, लोफर यांसारख्या चित्रपटात काम केलं आहे.