सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 22 ऑगस्ट 2020 (10:37 IST)

‘मिर्झापूर’चा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

अॅमेझॉन प्राइमवरील अतिशय गाजलेल्या ‘मिर्झापूर’चा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मिर्झापूर’च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘मिर्झापूर २’चा पहिला प्रोमो शेअर केला आहे. मिर्झापूर २ लवकरच तुमच्या भेटीला येणार असल्याचे त्यांनी प्रोमोमध्ये म्हटले आहे.
 
१६ नोव्हेंबर २०१८ रोजी मिर्झापूर या सीरिजचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. पहिल्या भागात अली फजलने गँगस्टर गुड्डू पंडितची भूमिका साकारली होती. उत्तरेकडील राजकारण आणि त्यातून येणारी गुंडगिरी याचे उत्तम चित्रीकरण मिर्झापूरमध्ये करण्यात आले होते. 
 
मिर्झापूर २ चे चित्रीकरण पूर्ण झाले असून एडिटिंगचे काम देखील पूर्ण झाले असल्याचे म्हटले जात आहे. या सीरिजमध्ये पंकज त्रिपाठी, विक्रांत मेसी, श्वेता त्रिपाठी, अली फजल आणि इतर कालाकर दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.