1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 17 ऑगस्ट 2020 (16:53 IST)

नीट, जेईई परीक्षा वेळेतच होणार, कोर्टाचा निर्णय

JEE exam
नीट आणि जेईई परीक्षा वेळेतच होणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सप्टेंबर महिन्यात या परीक्षा नियोजित आहेत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली होती. न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.
 
न्यायालयाने याचिका फेटाळताना परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांचं करिअर आपण संकटात टाकत आहोत असं म्हटलं. खंडपीठाने यावेळी सॉलिसिटर जनरल यांनी परीक्षा घेताना संपूर्ण काळजी घेतली जाईल असं आश्वासन दिलं असल्याची नोंद घेतली. धोरणात्मक निर्णयात आम्ही हस्तक्षेप करु शकत नाही असंही यावेळी न्यायालयाने सांगितलं.
 
आम्ही अनिश्चित काळासाठी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत नसून फक्त काही वेळा ती पुढे ढकलली जावी अशी विनंती करत असल्याचं वकील अलख यांनी यावेळी म्हटलं.