बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 17 ऑगस्ट 2020 (08:12 IST)

निलेश राणे यांना कोरोनाची लागण

माजी खासदार आणि भाजपा नेते निलेश राणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. निलेश राणे यांनी स्वत: यासंदर्भातील माहिती दिली आहे. कोरोनाची लक्षणं दिसल्यानंतर चाचणी केली आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचं निलेश राणे म्हणाले. तसंच गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या संपर्कात आलेल्यांनीही आपली कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असंही त्यांनी सांगितलं.
 
“कोरोनाची प्राथमिक लक्षणं दिसल्यानं कोरोनाची चाचणी केली. त्यात माझा चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत उत्तम असून डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मी स्वत:ला सेल्फ क्वारंटाइन करून घेतलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करावी आणि काळजी घ्यावी,” असं निलेश राणे म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून यासंदर्भातील माहिती दिली आहे.