गुरूवार, 23 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified गुरूवार, 13 ऑगस्ट 2020 (08:19 IST)

केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांना कोरोना

केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करून याबाबत माहिती दिली. “मी कोरोनाची चाचणी केली आणि त्या चाचणीचे निकाल पॉझिटिव्ह आले आहेत. मी आता होम आयसोलेशनमध्ये आहे. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करावी आणि आवश्यक ती काळजी घ्यावी,” असं श्रीपाद नाईक म्हणाले. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.
 
श्रीपाद नाईक यांच्यापूर्वी केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं होतं. याव्यतिरिक्त केंद्रीय मंत्री कैलाश चौधरी यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती.