1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 8 ऑगस्ट 2020 (09:12 IST)

राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६७ टक्क्यांवर

The cure rate
राज्यात शुक्रवारी  नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची थोडी अधिक असून देखील १० हजार ९०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर १० हजार ४८३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६६.७६ टक्के  एवढे आहे. आतापर्यंत राज्यभरात ३ लाख २७ हजार २८१ रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या १ लाख ४५  हजार ५८२  रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.
 
पाठविण्यात आलेल्या २५ लाख ६९ हजार ६४५ नमुन्यांपैकी ४ लाख ९० हजार २६२ नमुने पॉझिटिव्ह (१९.०७ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ८२ हजार ७५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार २६२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात ३०० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.४९ टक्के एवढा आहे.