सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 11 ऑगस्ट 2020 (08:13 IST)

किरीट सोमय्या आणि त्यांची पत्नी दोघांनाही कोरोना

भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांची पत्नी मेधा सोमय्या या दोघांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. किरीट सोमय्यांनी स्वतः ट्विट करुन ही माहिती दिली आहे. “मी आणि माझी पत्नी मेधा सोमय्या कोरोना बाधित झालो असून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु करण्यात आले आहेत” असं किरीट सोमय्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नीला कोरोना संसर्ग झाल्याचे समजतात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मला विश्वास आहे की दोघेही लवकर बरे होतील. परमेश्वराचे आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठिशी आहेत असं ट्विट चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.