सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 8 ऑगस्ट 2020 (09:10 IST)

महावितरणने पाठवलेल्या बिलांमुळे खडसे यांनाही शॉक

लॉकडाऊनच्या काळात महावितरणने पाठवलेल्या मोठ्या बिलांमुळे थेट भाजप नेते एकनाथ खडसे यांनाही महावितरणने शॉक दिला आहे. खडसेंच्या जळगावमधील मुक्ताईनगरमधल्या घरासाठी १ लाख ४ हजार रुपयांचं वीज बिल पाठवण्यात आलं आहे. एप्रिल ते जुलै अशा ४ महिन्यांसाठी हे बिल आहे. 
 
या बिलानंतर लॉकडाऊनदरम्यान आलेली बिले अवास्तव असून ती भरू नये अस खडसेंनी म्हटलं आहे. सरकारने या वीज बिलांची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या बिलांमध्ये सवलत द्या, तसंच लोकांना वेठीला धरण्याचं काम करू नका, असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत. 
 
दरम्यान वीज बिलांच्या मुद्द्यावरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही आरोप केले आहेत. 'महावितरणकडे पगार द्यायलाही पैसे नव्हते. ठाकरे सरकारने आम्ही पैसे देणार नाही, असं सांगितलं. तेव्हा मंत्रालयात जादा वीज बिल पाठवण्याचा कट शिजला,' असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.