शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 15 जुलै 2020 (15:37 IST)

मद्यधुंदीत पतीने पत्नी आणि तीन मुलांवर अॅसिड फेकले

नवी दिल्लीत मद्यधुंदीत पतीने पत्नी आणि तीन मुलांवर अॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावेळी पत्नी आणि मुलांच्या ओरडण्याने आजूबाजूचे रहिवाशी लोक त्यांच्या मदतीसाठी धावून आले. पत्नीसह तीन मुलांना जगप्रवेश चंद रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. पण त्यांना तेथून एम्समध्ये रुग्णालयात पाठवण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यातील चौघांमधील दोन मुलांची प्रकृती स्थिर असून पत्नी आणि एका मुलांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान पोलिसांनी अॅ सिड बाटलीसह आरोपी शाहिदला अटक केली आहे. 
 
आरोपी पतीचे नाव शाहिद (वय ३२) आणि पत्नीचे नाव मुमताज (वय २८) असे नाव आहे. त्यांना आठ, सहा आणि चार वर्षांची मुले आहेत. शाहिद हा फळांचा व्यवसाय करतो आणि त्याला दारुचे व्यसन आहे. शनिवारी शाहिद दारू पिऊ घरी आला. त्यावेळेस त्याच्या हातात अॅसिड ची बाटली होती. 
 
शाहिद पत्नीशी भांडण करू लागला. यावेळेस त्यांची तीन मुलेही तिथे उभी होती. दरम्यान शाहिद दारुच्या नशेत होता त्यावेळेस त्याचा राग अनावर झाला आणि त्याने पत्नीसह तीन मुलांवर अॅसिड फेकले.