मंगळवार, 21 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified बुधवार, 29 जुलै 2020 (15:33 IST)

त्यांनीच शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं, रोहित पवार यांचा टोला

शरद पवार यांचे नातू आणि कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार  यांनी एक ट्विट केलं आहे, ज्यात चंद्रकांत पाटील यांचा नामोल्लेख न करता टीका केली आहे. “आजही शिवसेनेसोबत जाण्यास तयार असल्याचं भाजपातील एक मोठे नेते म्हणाले. सत्तेत येण्याची त्यांची घाई बघता ५ वर्षात भाजपापासून सोशल डिस्टन्स ठेवत अनेक इच्छुक असले, तरी किमान मला एकट्याला तरी महाविकास आघाडीत घ्या,असं म्हणून त्यांनीच शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं! आतातरी राजकारण थांबवा!,” असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.
 
राज्यातील महाविकास आघाडीविरोधात भाजप आक्रमक भूमिका घेत असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सोमवारीच अधोरेखित केले होते. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी शिवसेनेबाबत सौम्य भूमिका घेत, युतीसाठी दरवाजे उघडे असल्याचे संकेत दिले. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानानंतर रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे.