मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 29 जुलै 2020 (15:29 IST)

Rafale Landing In India : ‘हॅप्पी लँडिंग’

राफेल फायटर (Rafale fighter) विमानांच्या आगमनाला आता फक्त काही मिनिटे उरली आहेत. राफेल भारताच्या हवाई हद्दीत दाखल झाले आहे. हरयाणामधील अंबाला बेसवर दुपारी दोन वाजता ही विमाने उतरतील. नौदलाने राफेलच्या वैमानिकांना ‘हॅप्पी लँडिंगच्या शुभेच्छा दिल्या (new fighter jet rafale lands)आहेत. यूएईच्या (UAE) अल धफ्रा बेसवरुन उड्डाण केल्यानंतर राफेलच्या तुकडीने पश्चिम अरबी सागरात तैनात असलेल्या भारतीय नौदलाच्या INS कोलकात्ता या युद्धनौके बरोबर संपर्क साधला.
 
पाच राफेल फायटर विमानांनी अंबालाच्या एअर फोर्स बेसवर लँडिंग करणार आहेत. इथेच राफेलचा कायमस्वरुपी तळ असणार आहे. फ्रान्स मेरिनॅक एअर फोर्सच्या तळावरुन सोमवारी सकाळी या विमानांनी उड्डाण केले होते. संयुक्त अरब अमिरातीच्या अल धफ्रा बेसवर ही विमाने एकदिवस थांबली. त्यानंतर आज भारतात दाखल झाली. राफेलच्या पहिल्या तुकडीत तीन सिंगल सीटर आणि दोन डबल सीटर विमाने आहेत.
 
फ्रान्समध्ये (France)प्रशिक्षित करण्यात आलेले भारतीय वैमानिक ही विमाने घेऊन भारतात आले. राफेल फायटर (new fighter jet rafale lands) जेटच्या हाताळणीसाठी IAF चे बारा वैमानिक आणि इंजिनिअरींग क्रूला पूर्णपणे प्रशिक्षित करण्यात आले आहे. उड्डाणवस्थेत असतानाच या विमानांमध्ये इंधन भरण्यात आले. २० ऑगस्टला पारंपारिक पद्धतीने सोहळा आयोजित करुन या फायटर विमानांचा भारतीय हवाई दलात समावेश करण्यात येईल.
 
IAF च्या एअर क्रू आणि ग्राऊंड क्रू टीमला हे विमान कसे हाताळायचे, त्याबद्दल व्यापक असे प्रशिक्षण देण्यात आले आहे. भारताने फ्रान्सबरोबर २०१६ साली अशी ३६ राफेल विमाने खरेदी करण्याचा ५९ हजार कोटी रुपयांचा करार केला आहे. पूर्णपणे अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज विमाने फ्रान्सकडून भारताला देण्यात आली आहेत. लवकरात लवकर या विमानांचा वापर करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
 
राफेलचे पहिले स्क्वाड्रन अंबाला एअर बेसवर तर दुसरे स्क्वाड्रन पश्चिम बंगाल हाशिमारा येथे असेल. भारताला मिळणारी राफेल फायटर विमाने मिटिओर आणि स्काल्प अशा मिसाइल्सनी सुसज्ज असतील. यामुळे शत्रुच्या प्रदेशात खोलवर अचूक हल्ला करण्याची भारतीय हवाई दलाची क्षमता कैकपटीने वाढणार आहे तसेच हवाई वर्चस्व सुद्धा प्रस्थापित करता येईल. सध्या चीन आणि पाकिस्तानकडे राफेलच्या तोडीचे एकही विमान नाहीय.