मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 जुलै 2020 (16:18 IST)

आयपीएलचा तेरावा हंगाम येत्या १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये

आयपीएलचा तेरावा हंगाम येत्या १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरु होणार असून ८ नोव्हेंबरला स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला याबद्दल माहिती दिली. स्पर्धेच्या आयोजनात कोणताही बदल करण्यात आलेला नसून, बीसीसीआयने सर्व संघमालकांना याबद्दल प्राथमिक कल्पना दिलेली आहे. 
 
“१९ सप्टेंबर (शनिवारी) ला स्पर्धेला सुरुवात होण्याची शक्यता आहे आणि ८ नोव्हेंबर (रविवार) ला स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल. ५१ दिवसांचा हा कालावधी सर्व संघमालक, ब्रॉडकास्टर् आणि इतर सदस्यांसाठीही योग्य आहे.” ब्रिजेश पटेल पीटीआयला ही माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी आयसीसीने ऑस्ट्रेलियात प्रस्तावित टी-२० विश्वचषकाचं आयोजन वर्षभरासाठी पुढे ढकललं आहे. 
 
याआधी २६ सप्टेंबरपासून आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार असा अंदाज बांधला जात होता. परंतु युएईवरुन भारतीय संघ थेट ऑस्ट्रेलिया दौऱ्याला रवाना होईल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आयसीसीच्या नियमांप्रमाणे १४ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण करण्यासाठी आयपीएल स्पर्धा लवकर सुरु करण्याचं बीसीसीआयने ठरवलं आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या वेळापत्रकावर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी बीसीसीआयने हे पाऊल उचलल्याचं कळतंय. प्रत्येक संघाला सरावासाठी किमान एका महिन्याची गरज असल्यामुळे २० ऑगस्टरोजी संघ युएईसाठी रवाना होतील.