पिप्पलाद अवतार : यामुळे 16 वर्षाच्या वयापर्यंत शनी त्रास देत नसतात
शिव महापुराणात भगवान शिवाचे अनेक अवताराचे वर्णन केले आहे. कुठे कुठे तर त्यांचे 24 तर कुठे 19 अवतारांचे उल्लेख केले गेले आहे. तस तर शिवाचे अंशावतार बरेचशे झाले आहे. शिवाचे काही अवतार तंत्रमार्गी आहे तर काही दक्षिणमार्गी आहेत. चला तर मग जाणून घेउ या शिवाचा पिप्पलाद अवताराची लघु कथा....
पिप्पलाद अवतार : वृत्तसुराचे वध करण्यासाठी महर्षी दधिचीच्या हाडांचे वज्र बनवून इंद्राने वृत्तसुराचे वध केले होते, कारण दधिचींचे हाडं शिवाच्या तेजासह आणि सामर्थ्यवान असे. महर्षी दधिचीची बायको आश्रमात परत आल्यावर त्यांना समजल्यावर की महर्षींच्या हाडांचा वापर देवांच्या अस्त्र शस्त्र बनविण्यामध्ये केला जात आहे तर त्या सती होण्यासाठी उत्सुक झाल्या तेवढ्यात आकाशवाणी झाली की आपल्या पोटी महर्षी दधीचीच्या ब्रह्म तेजाने भगवान शंकराचा अवतार जन्म घेईल म्हणून त्यांचे रक्षण करायलाच हवं.
हे ऐकून सुवर्चा जवळच्या झाडा खालीच बसल्या जिथे त्यांनी एका सुंदरश्या मुलाला जन्म दिला. पिंपळ्याचा झाडाखाली जन्म दिल्यामुळे ब्रह्माजींनी त्याचे नाव पिप्पलाद ठेवले आणि सर्व देवांनी त्यांच्यावर सर्व संस्कार पूर्ण केले. महर्षी दधिची आणि त्यांची बायको सुवर्चा दोघेही शिवाचे भक्त होते. त्यांचा आशिर्वादामुळेच त्यांच्याकडे भगवान शिवाने पिप्पलादच्या रूपाने जन्म घेतले.
शनी कथा : कहाणी अशी आहे की पिप्पलादाने देवांना विचारले की - माझे वडील दधिची हे माझ्या जन्माच्या आधीच मला सोडून गेले यामागील कारण काय ? जन्मताच माझी आई देखील सती झाली आणि लहानग्या वयापासूनच मी अनाथ होऊन त्रास सोसत आहे.
हे ऐकून देवांनी सांगितले की शनिग्रहाच्या दृष्टीमुळेच असे कुयोग बनले आहेत. पिप्पलाद हे ऐकून फार कोपीत झाले आणि म्हणाले की हे शनी तर तान्हया बाळांनाही सोडत नाही. त्यांना एवढा अभिमान आहे.
मग एके दिवशी त्यांचा सामना शनींशी झाला तर महर्षीने आपले ब्रह्मदंड उचलून शनींवर उगारले ज्याचा मार शनी सहन करू शकत नव्हते त्यामुळे ते घाबरून पळू लागले.
तिन्ही लोकांची प्रदक्षिणा घालून देखील ब्रह्म दंडाने शनिदेवांचा पाठलाग काही सोडला नाही आणि दंड त्यांच्या पायाला लागला ज्यामुळे शनिदेव हे पांगळे झाले. देवांनी
पिप्पलाद मुनींना शनिदेवाला क्षमा करण्याची विनवणी केली, तेव्हा पिप्पलाद मुनीने शनिदेवाला क्षमा केले.
देवांच्या विनवणीवर पिप्पलादांनी शनींना या गोष्टीवर माफ केले की शनी जन्मापासून ते वयाच्या 16 वर्षापर्यंत कोणास ही त्रास देणार नाही. तेव्हापासूनच पिप्पलादाच्या स्मरणानेच शनीची पीडा किंवा त्रास दूर होतो.