शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रीरामनवमी
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 एप्रिल 2021 (08:37 IST)

Ram Raksha Stotra : राम रक्षा स्तोत्राचे 10 रहस्य

श्री राम रक्षा स्तोत्र बुध कौशिक ऋषींद्वारे रचित श्रीराम स्तुती आहे. यात प्रभू श्रीरामांचं गुणगान केलं गेलं आहे. परंतू यात किती शक्ती आहे हे माहित नसल्यास जाणून घ्या याबद्दल काही महत्त्वाची माहिती-
 
1. राम रक्षा स्त्रोत पाठ केल्याने प्रभू श्रीराम आपली प्रत्येक संकटापासून रक्षा करतात. त्यांच्या शरण आलेल्यांची रक्षा करणे त्यांचं धर्म आहे.
 
2. राम रक्षा स्त्रोताचा नियमित पाठ केल्याने हनुमान प्रसन्न होऊन राम भक्तांची रक्षा करतात.
 
3. विधीपूर्वक राम रक्षा स्त्रोताचा 11 वेळा पाठ करताना एका वाटीत मोहरीचे दाणे घेऊन त्यांना बोटांनी फिरवत राहिल्याने ते सिद्ध होतात. नंतर दाणे घरात योग्य ठिकाणी ठेवावे. हे दाणे कोर्ट-कचेरी जाताना, प्रवासाला जाताना किंवा एकांत ठिकाणी झोपताना आपली रक्षा करतात. 
 
4. राम रक्षा स्तोत्रम्चा 11 वेळा पाठ करत असताना पाणी देखील सिद्ध करता येतं. हे पाणी औषध म्हणून वापरावं. हे पाणी आजारी माणसाला देता येतं. याने औषधांचा प्रभाव जलद गतीने होतो. पाणी सिद्ध करण्यासाठी राम रक्षा स्तोत्र पाठ करताना तांब्याच्या भांड्यात पाणी भरुन आपल्या हातात धरुन ठेवावं व आपली दृष्टी पाण्यावर असावी.
 
5. जी व्यक्ती नित्य नियमाने राम रक्षा स्तोत्रम् पाठ करतात ती येणार्‍या अनेक प्रकाच्या आपत्तींपासून वाचतात.
 
6. याचे दररोज पाठ केल्याने व्यक्तीला दीर्घायु, संतान, शांती, विजय, सुख व समृद्धी प्राप्त होते.
 
7. राम रक्षा स्त्रोताचं नियमित पठन केल्याने मंगळ ग्रहाचा कुप्रभाव नाहीसा होतो.
 
8. राम रक्षा स्त्रोताचा नियमित पाठ करणार्‍या भक्ताच्या मनात सकारात्मक भावाचा संचार होतो व त्याच्या चारीबाजूला सुरक्षा चक्र निर्मित होतं.
 
9. राम रक्षा स्त्रोताचा पाठ केल्याने मनुष्य भयमुक्त होतो व निर्भय आयुष्य जगतो.
 
10. राम रक्षा स्त्रोताचा नियमित पाठ केल्याने महादेवाची कृपा प्राप्त होते कारण या स्त्रोताची रचना बुध कौशिक ऋषींनी महादेवांच्या सांगण्यावरुन केली होती. महादेवांनी त्यांच्या स्वप्नात येऊन स्त्रोत रचनेची प्रेरणा दिली होती.
 
नोट- हे उपाय प्रचलित मान्यतांवर आधारित आहेत. आम्ही त्यांच्या प्रभावाची पुष्टी करत ​​नाही.