सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: बुधवार, 29 जुलै 2020 (15:20 IST)

पाप कुठे जात असत

एकदा एका ऋषींनी विचार केला की लोक गंगेत पाप धुण्यास जातात, तर याचा अर्थ असा होतो की सर्व पाप गंगेमध्ये विरघळल्या गेले असेल आणि गंगा देखील पापी बनली असेल. पण गंगा तर पापी नाहीये, मग हे पाप कुठे जात असेल? 

हे जाणून घेण्यासाठी त्याने तपश्चर्या सुरू केली. कठोर तपश्चर्या केल्यामुळे देव प्रसन्न झाले. देव त्या ऋषी समोर प्रकट झाला. ऋषींनी देवाला विचारले "हे देवा सर्व लोक गंगेमध्ये आपले पाप धुण्यासाठी येतात मग ते धुतलेले पाप कुठे जाते?"
 
 
भगवान म्हणाले की "चल आपण त्या गंगालाच विचारू."
ते दोघे गंगाजवळ गेले आणि म्हणाले, "हे गंगे ! इथे सर्व लोक येऊन त्यांचे पाप धुतात, ते सर्व पाप तुझ्या पाण्यात मिसळले आहे, तर मग आम्हाला सांग की तू सुद्धा आता पापी झाली आहेस ना?"
गंगा म्हणाली, "मी का म्हणून पापी होईल?, मी तर ते सर्व पाप घेऊन समुद्राला अर्पण करत असते!"
 
आता ते लोक समुद्राकडे गेले, आणि समुद्राला विचारले "हे समुद्र देवता, गंगा म्हणाली की ती तिचे सर्व पाप तुम्हाला येऊन अर्पण करते, याचा अर्थ असा की आपण देखील पापी झाला आहात!"
समुद्र म्हणाला, "मी पापी कसा असेन?, मी ते सर्व पापे घेतो आणि त्याची वाफ बनवून त्या ढगांना देऊन टाकतो !"
 
आता ते लोक ढगांकडे गेले आणि म्हणाले, "हे ढगांनो! ज्या समुद्राने जे पाप गंगे कडून घेतले, ते त्याने वाफ बनवून तुम्हा ढगांना दिले आहे. तर आता याचा अर्थ असा की आपण पापी झाला आहात! "
ढग म्हणाला... " मी कसा काय पापी होईल ? मी तर ते सर्व पावसाच्या रूपाने पृथ्वीवर पाठवतो. या पावसामुळे शेतात पीक येत. हे उपजलेले पीक, अन्न म्हणून सर्व लोक खातात. हे अन्न ज्या मानसिकतेने पिकविल्या जाते, त्याच वृत्तीने त्यांना ते प्राप्त होते. आणि ज्या मानसिकतेने माणसाकडून खाल्या जाते, त्याच मानसिकतेचा मनुष्य बनतो. त्यानुसार, मानवी मानसिकता तयार होते "
 
कदाचित म्हणूनच म्हणतात " जो जैसा खाएं अन्न, वैसा बनता उसका मन " 
 
म्हणूनच अन्न हे ज्या वृत्तीने मिळवलं जात असत आणि ज्या मानसिक स्थितीत खाल्ले जाते, तसेच त्या माणसाचे विचार बनत जातात.
 
या करिता अन्न नेहमीच देवाचे नाव घेत घेत आणि शांत मनस्थितीत खावे. आणि जे धान्य खरेदी करणार ते पैसे प्रामाणिकपणे कमावलेले आणि परीश्रमाचे असले पाहिजेत!
 
अन्नग्रहण करण्यापूर्वी करावयाची प्रार्थना
 
वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ।
सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।
जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म ।
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ॥१॥
जनीं भोजनी नाम वाचे वदावे ।
अती आदरे गद्यघोषे म्हणावे ।
हरीचिंतने अन्न सेवित जावे ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥२॥
 
`हे देवा, हे अन्न तुझ्या चरणी अर्पण करून तुझा प्रसाद या भावाने मी ग्रहण करत आहे. या प्रसादातून मला शक्‍ती व चैतन्य मिळू दे.’ अन्न देवाला अर्पण करा व नंतर देवाचा प्रसाद म्हणून नामजप करत ग्रहण करा.

- सोशल मीडिया