सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 5 ऑगस्ट 2020 (14:57 IST)

कंगनाचा आदित्य ठाकरेंना विचारले 7 प्रश्न

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजिव आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मौन सोडलं असून या प्रकरणाशी काडीमात्र संबंध नसल्याचे म्हटले आहे. 
 
या प्रकरणी शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर आरोप केला गेला आहे ज्यात शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, आदित्य ठाकरे यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.
 
आता यावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने थेट आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तिने चार ट्वीट करून 7 प्रश्न केले आहेत. तिने म्हटले की सुशांत सिंह राजपूत प्रकरणी आपल्या वडिलांकडून आधी 7 प्रश्नांची उत्तरं घेऊन या.