बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 30 जुलै 2020 (08:52 IST)

सुशांतसिंग राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआय करणार नाही

अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आणि अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांनी केली होती, पण गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही मागणी फेटाळून लावली आहे. सुशांतसिंग राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे जाणार नाही. मुंबई पोलीसच याप्रकरणी तपास करतील, असं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
 
मुंबई पोलीस सुशांतसिंग राजपूत प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सक्षम आहे, तसंच मुंबई पोलीस या प्रकरणाचा योग्य तपास करत आहेत, असं अनिल देशमुख म्हणाले आहेत.
 
सोमवारी पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटून सुशांतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी केली होती. 'सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्ये प्रकरणी योग्य चौकशी व्हावी अशी भावना संपूर्ण देश आणि विशेषत: तरुणांची आहे. त्यामुळे याप्रकरणी सीबीआय चौकशी सुरू करण्यात यावी, ' असं ट्विट पार्थ पवार यांनी केलं होतं.