शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 20 जुलै 2020 (20:26 IST)

Corona cases in Mumbai- पुढच्या 2 आठवड्यात या भागात कोरोना आटोक्यात येईल

corona cases in mumbai- बीकेसीमधील कोविड सेंटरच्या आर्थिक व्यवहारात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा सणसणीत आरोप भाजपचे आमदार अमित साटम यांनी केली होता. त्यावर आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधक कितीही टीका करत असले तरी एमएमआरडीएने हे जाहीर केल्यानंतर माझ्यासाठी हा थर्ड अंपायरचा हा निर्णय असल्यासारखं झालं असल्याचं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.
 
माझे दोन्ही वॉर्ड ऑफिसर किरण दिघावकर आणि शरद उघडे हे 100 दिवस घरी गेले नाहीत. सगळेजण जीव ओतून काम करत आहेत. सगळ्यांची ही एकत्रित मेहनत आहे असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
 
भाजपचे आमदार अमित साटम यांनी लोकायुक्तांकडे एमएमआरडीएतर्फे वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे निविदा न मागवता कोविड सेंटर उभारण्याचं काम दिल्याबद्दल तक्रार केली होती. एमएमआरडीएने कोणतीही निविदा न मागवता बीकेसी 40 कोटींपेक्षा जास्त काम दिलं आहे.
 
त्यात 22 कोटी रुपये खर्च हा केवळ तात्पुरते शेड उभारण्यासाठी करण्यात आला आहे. तसंच हे सेंटर 50 टक्केपेक्षा जास्त रिक्त जागा असून एवढे मोठे सेंटर करण्याच्या निर्णयावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचं देखील आमदार साटम यांनी म्हटलं होतं.
 
राज्यात कोरोनाचा हाहाकार वाढतच चालला आहे. मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असून रुग्णांची संख्या थांबण्याचं काही नाव घेत नाहीये. पण अशात आता मध्य मुंबईनंतर उत्तर मुंबईतदेखील पुढच्या दोन आठवड्यात कोरोना आटोक्यात येईल अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
 
राज्यात आज कोरोना रुग्णांच्या संख्येत उच्चांकी वाढ झालीय. गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 9518 रुग्ण आढळून आले आहेत. तर 258 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 3,10,455 एवढी झालीय. तर मृत्यूचा आकडा 12 हजारांच्या जवळ गेला आहे. आज 3906 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात 1,28,730 Active रुग्ण आहेत. तर राज्यातल्या एकूण मृत्यूची संख्या ही 11 हजार 854 वर गेली आहे.
 
काल मुंबईत 1038 नवे रुग्ण आढळून (corona cases in mumbai) आलेत. त्यामुळे मुंबईतल्याच एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 1 हजार 388 एवढी झाली आहे. काल मुंबईत 64 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतल्या रुग्णांची मृत्यूसंख्या ही 5714 वर गेली आहे.
 
तर देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतांनाच कोरोनावरच्या लशींच्या संशोधनातही प्रगती झाली आहे. जगभर धुमाकूळ घालणाऱ्या COVID-19वर लस शोधण्यासाठी सर्व जग प्रयत्न करत आहे. सर्व देशांमधले तज्ज्ञ डॉक्टर्स, औषध निर्माण क्षेत्रातल्या कंपन्या अहोरात्र प्रयत्न करत आहेत.
 
या प्रयत्नांमध्ये भारतही आघाडीवर असून यात 7 कंपन्यांनी (Indian pharma companies) मोठा पल्ला गाठला आहे. यातल्या बायोटेकच्या लशीची मानवी चाचणीसुद्धा सुरु झाली आहे. तर इतर काही कंपन्याही क्लिनिकल चाचण्यांसाठी तयार आहेत. यात यश मिळालं तर 130 कोटींच्या आपल्या देशाला आणि सर्व जगालाच त्याचा फायदा होणार आहे.