बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : सोमवार, 20 जुलै 2020 (20:26 IST)

Coronavirus Live Updates : सावधान! आता 'या' ६ प्रकारे होऊ शकतं कोरोनाचं संक्रमण; WHOची धोक्याची सुचना

अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये एका दिवसात कोरोना रुग्णांचा आकडा वाढल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) सांगितले की, कोरोनाची माहामारी अजून रौद्र रुप धारण करू शकते. या व्हायरसच्या प्रसाराबाबत जागतिक आरोग्य संघटनेने माहिती दिली आहे. कोरोना व्हायरस कोणकोणत्या माध्यमातून पसरू शकतो याबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितले की, सहा प्रकारे कोरोना व्हायरसचं संक्रमण होऊ शकतं. कोरोना व्हायरसशी संबंधित सर्व माहिती....

संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे
संक्रमित व्यक्तीच्या शिंकण्यातून किंवा खोकण्यातून
संक्रमित व्यक्तीच्या रक्तामुळे 
आईला कोरोनाची लागण झाली असल्यास बाळालाही कोरोनाचं संक्रमण होऊ शकतं.
संक्रमित व्यक्तीने उघड्यावर मलविसर्जन केल्यास 
व्हायरसच्या विळख्यात अडकलेल्या प्राण्यांच्या संपर्कात आल्यामुळे

08:25 PM, 20th Jul
Corona cases in Mumbai- पुढच्या 2 आठवड्यात या भागात कोरोना आटोक्यात येईल
corona cases in mumbai- बीकेसीमधील कोविड सेंटरच्या आर्थिक व्यवहारात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा सणसणीत आरोप भाजपचे आमदार अमित साटम यांनी केली होता. त्यावर आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधक कितीही टीका करत असले तरी एमएमआरडीएने हे जाहीर केल्यानंतर माझ्यासाठी हा थर्ड अंपायरचा हा निर्णय असल्यासारखं झालं असल्याचं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.


02:14 PM, 20th Jul
प्रकृती अस्वस्थतेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर रुग्णालयात दाखल
प्रकृती अस्वस्थतेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
 


11:34 AM, 20th Jul
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख कोरोना पॉझिटिव्ह
ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. अस्लम शेख यांनी स्वत: ट्विट करुन ही माहिती दिली आहे.
 

11:16 AM, 20th Jul
आरोग्य चाचणी आता रेल्वे स्थानकांवर
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकांवर एव्हीएम बसवण्यात येणार आहे. प्रवाशाला नवीन मास्क, सॅनिटायझर आणि ग्लोव्ह्‌जची आवश्यकता असेल तर कोविड-१९ Covid-19 प्रतिबंधात्मक स्वयंचलित वेंडिंग मशीन डिस्पेंसरमधून त्वरित मिळवता येतील.

08:24 AM, 20th Jul
Coronavirus राज्यात करोनाचा नवा उच्चांक; २४ तासांत ९ हजार रुग्णांची नोंद
महाराष्ट्रात करोना बाधित रुग्णांचा आकडा तीन लाखांचा टप्पा ओलांडून पुढे गेला आहे. आज राज्यात तब्बल ९ हजार ५१८ नवीन रुग्णांची भर पडली आहे. राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येनं आज उच्चांक गाठला असल्यानं आरोग्य प्रशासनाची झोप उडाली आहे. यासोबतच देशातील करोनाग्रस्त राज्यांत महाराष्ट्र पहिल्या स्थानी असल्यानं चिंता वाढली आहे.