शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 9 मार्च 2020 (17:48 IST)

कोरोना व्हायरसबद्दल 10 खोट्या गोष्टी, ज्या आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे

जगभरात 100 हून अधिक देशांमध्ये कोरोना व्हायरस पाय पसरून चुकला आहे. भारतात देखील कोरोना व्हायरसने संक्रमित लोकांची संख्या वाढत आहे. कोरोना व्हायरसबद्दल खूप अफवादेखील पसरत आहे ज्यामुळे लोकांमध्ये भीती बसलेली आहे. जाणून घ्या कोरोना व्हायरसशी निगडित 10 खोटे आणि त्यांचं सत्य
 
1. काय सर्दीमुळे व्हायरस पसरतो का?
सत्य : असे आवश्यक नाही. युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग मध्ये कोरोना व्हायरसवर झालेल्या रिसर्चमध्ये आढळले की सामान्य फ्लू पीडित व्यक्तीहून 3 लोकांपर्यंत व्हायरस पसरतं, तसंच कोरोना संक्रमित व्यक्ती अधिक लोकांना संक्रमित करू शकतं. फ्लूचा उपचार आहे परंतू COVID-19 च्या कोणत्याही वॅक्सीनचा शोध आतापर्यंत लागलेला नाही.
 
2. काय संसर्ग म्हणजे मृत्यू?
सत्य : असे काही नाही की COVID-19 संक्रमण होणे म्हणजे मृत्यू. चीनमध्ये कोरोना संक्रमण प्रभावित 58 हजाराहून अधिक लोक स्वस्थ झाले आहेत. भारतातच 3 लोक या आजाराहून मुक्त झाले आहेत. तज्ज्ञांप्रमाणे या आजारात मृत्यूचा धोका सुमारे 20 टक्के आहे.
 
3. काय पाळीव प्राण्यांहून कोरोनाचा धोका असतो?
सत्य : आतापर्यंत कोणत्याही शोधात असे आढळलेले नाही की पाळीव जनावरांमुळे कोरोना संक्रमणाचा धोका वाढतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन प्रमाणे आतापर्यंत असे कुठलेही प्रकरण समोर आले नाही. होय तरी जनावरांना हात लावल्यावर साबणाने हात धुणे आवश्यक आहे. 
 
4. काय कोरोनावर औषध सापडलंय?
सत्य- कोरोना व्हायरससाठी आतापर्यंत कुठलंही वॅ‍क्सीन नाही. जगभरात वैज्ञानिक कोरोनाचा खात्मा करण्यासाठी वॅ‍क्सीन शोधत आहे. तरी यावर वॅक्सीन शोधल्याचा चीनने दावा केला आहे.
 
5. मुलांमध्ये कोरोनाचा धोका नाही?
सत्य- असे नाही की या प्राणघातक व्हायरसचा धोका मुलांवर नाही, परंतू आतापर्यंत समोर आलेल्या केसेसमध्ये बुजुर्ग आणि वयस्करांची संख्या लहान मुलांच्या तुलनेत अधिक आहे अर्थात मुलांवर याचा प्रभाव कमी बघायला मिळत आहे. 'चायना सीडीसी विकली' यात प्रकाशित रिसर्चप्रमाणे 10 ते 19 वयोगटातील लोकांपैकी केवळ 1 टक्केच संक्रमण प्रभावित होते. 10 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये हे इन्फेक्शन 1 टक्क्यांहून कमी दिसून आलं आणि कोणाच्याही मृत्यूची नोंद नाही. 
6. वाढत्या तापमानामुळे विषाणूचा नाश होणार?
सत्य - वाढत्या तापमानामुळे विषाणूचा बळी झाल्याचे कुठलेही पुरावे अद्याप सामोरी आले नाही. वाढत्या उष्णतेमुळे विषाणू कमी पसरतात. त्यामुळे विषाणू पसरण्याचा धोका कमी होतो. त्यामागचे कारण असे की विषाणू उष्णतेबद्दल अत्यंत संवेदनशील असतात.
 
7. कोमट पाण्याने अंघोळ केल्यास संक्रमणाचा धोका कमी होतो
सत्य- हे वस्तुस्थिती खोटे आहे  फक्त कोमट पाण्याने अंघोळ केल्याने कोरोनाच्या विषाणूंपासून बचाव होत नसते. साबणाचा वापर करून आणि हात-पाय वारंवार स्वच्छ धुऊन आणि हात स्वच्छ करणारे औषधाचा वापर करून आपण या पासून बचाव करू शकतो.
 
8. रोग प्रतिरोधक शक्ती वाढविणारे औषधे कोरोना रोखू शकतात
सत्य- ऍलोपॅथिक, होमिओपॅथी,आयुर्वेदिक औषधे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवून कोरोनापासून आपला बचाव करू शकतात असे शक्य नाही.
 
9. नाकात ब्लीच लावण्याने कोरोनापासून बचाव?
सत्य- ब्लीच किंवा क्लोरीन सारखे जंतुनाशक सॉल्व्हेंट्स ज्यात 75 टक्के इथेनॉल, पॅरासिटिक ऍसिड आणि क्लोरोफॉर्म असतं, खरं तर कोरोना व्हायरसला पृष्ठभागावरचं नष्ट करू शकतं. परंतू तथ्य हे आहे की असे कीटनाशक त्वचेवर लावल्याने कुठलाही फायदा होत नाही उलट असे रसायन हानिकारक असू शकतात.
 
10. प्रत्येकाने N95 मास्क घालणे आवश्यक
सत्य- कोरोना संक्रमित रुग्णांसोबत काम करणारे हेल्थ केअर वर्कर्सला N95 मास्क घालणे आवश्यक आहे. सामान्य लोक ज्यांच्या असे कुठलेही लक्षण नाही, त्यांना कुठल्याही मास्कची आवश्यकता नाही. तरी जर आपण सामान्य मास्क घालत असाल तर आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं.