शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 4 मार्च 2020 (16:21 IST)

या व्हिटॅमिनची कमतरता मृत्यूला कारणीभूत ठरू शकते..

आपल्या शरीराला उर्जावान आणि निरोगी राहण्यासाठी पौष्टिक आणि संतुलित आहाराची गरज असते. ज्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, खनिज, कॅल्शियम, फास्फोरस, लोहची  संतुलित मात्र असते. शरीरासाठी 8 प्रकाराच्या व्हिटॅमिन्सची गरज असते. व्हिटॅमिन ए, बी, सी, डी, के. आज आपण व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरते मुळे होणारे दुष्परिणाम  जाणून घेऊ या...
 
या व्हिटॅमिनची कमतरता मृत्यूला कारणीभूत ठरू शकते.
व्हिटॅमिन बी 12 किंवा सायनोकोबालामिन व्हिटॅमिन बी 12 शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. उत्तम आरोग्य आणि उत्तम मज्जासंस्थेसाठी व्हिटॅमिन बी 12 किंवा  सायनोकोबालामिन अत्यंत आवश्यक आहे. आजच्या काळात खाण्यापिण्याच्या सवयींमुळे व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता बहुतेक लोकांमध्ये आढळत आहे. या व्हिटॅमिनची  कमतरता मृत्यूला कारणीभूत ठरू शकते. व्हिटॅमिन बी 12 शाकाहारी पदार्थात कमी आढळते. प्राण्यांमधून मिळणाऱ्या अन्न पदार्थात मिळते. बी 12 दूध, दही, अंडी, मासे,  चिकन, चीज कॉड लिव्हर तेलात आढळते. व्हिटॅमिन बी 12 शरीराच्या चरबीचे ऊर्जेमध्ये रूपांतरण करते. हे डी.एन.ए. आणि लाल रक्त पेशींचे निर्माण करते. शरीराच्या प्रत्येक  भागास मज्जातंतूंना प्रथिने पुरविते. मज्जातंतू व्यवस्थितरीत्या कार्य करण्यासाठी हे गरजेचे आहे. याच्या अभावामुळे मेंदूला नुकसान होऊ शकते. त्यामुळे मृत्यू होऊ शकते.  मज्जासंस्थेसाठी बी 12 आवश्यक आहे. दर रोज च्या जेवणात माणसाला 2 .4 मिलीग्राम बी 12 ची गरज असते.
 
बी 12 च्या कमतरते चे लक्षण-
1 वजन कमी होणे
2 हृदयाचे ठोके वाढू लागणे
3 श्वास लागणे
4 थकवा आणि अशक्तपणा जाणवणे
5 बद्धकोष्ठतेचा त्रास होणे
6 स्मरणशक्तीचा ह्रास होणे
7 पोटांचे विकार उद्भवणे
8 डोकं दुखण्याचा त्रास उद्भवणे
9 जुलाब होणे
10 रक्ताल्पता होणे
11 हात-पायाला मुंग्या येणे, हात -पायांची जळं-जळं होणे, हात-पाय थंड पडणे
12 सांधेदुखीचा त्रास होणे
 
बी12 वाढवण्यासाठी आहारात सामील करा
मासे, अंड्याचा पिवळा बलक, चिकन
दूध आणि दुग्धजन्य पदार्थ
आंबवलेले पदार्थ
भरपूर प्रमाणात पाणी