मंगळवार, 19 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: रविवार, 1 मार्च 2020 (13:35 IST)

वजन कमी करण्यासाठी काही सोपे व्यायाम

* पोट कमी व्हावे यासाठी सोपा उपाय म्हणजे बसताना, उठताना, लिहीत वा चालत असताना पोट आत ओढावे. श्वासही जेवढा वेळ आत ओढता येईल, तेवढा ओढावा व सोडावा. असे नियमितपणे करावे व जमेल तितकी श्वास आत ओढण्याची वेळ वाढवत न्यावी.
 
* शरीर चुस्त होऊन त्यात तरतरी यावी यासाठी पाय ताठ करून व ते जुळवून उभे राहावे. कथ्थक नृत्यात दोन्ही हात जमिनीस आडवे व समांतर ठेवतात, तसे ठेवावे. मग डावा गुडघा हातांच्या दिशेने वर उचलत न्यावा. उजवा पाय ताठच ठेवा मग उजवा गुडघा असाच वर उचलावा व डावा पाय स्थिर ठेवावा.
 
* नियमितपणे दोरीवरील उड्या मारावत. दर आठवड्यास एका दमात मारल्या जाणार्‍या उड्यांची संख्या वाढवत न्यावी.
 
* बेडूक उड्या मारण्यास बसतो, तसे बसावे. तेव्हा दोन्ही पाय व हात यावर समप्रमाणात भार टाकावा. श्वास आत घ्यावा. डोके खाली घालावे. नितंब आत घेऊन पाठ आत ओढावे. श्वास सोडावा. पाठ मोकळी पण सपाट सोडावी.
 
* प्रत्येकाने व्यायामाच्या प्रकाराची निवड करताना तो आपल्या देहयष्टीनुसार निवडावा. सायकलिंग, जॉगिंग, पायी चालणे इ. प्रकारचे व्यायाम अधिक करावेत. यामुळे शरीर व मन या दोघांमध्ये स्फूर्ती राहते.
 
* भराभरा पायी चालणे हा व्यायामाचा सर्वात सोपा व तेवढाच परिणामकारक प्रकार आहे. यामुळे कॅलरीज तर खर्च होतातच, पण त्याबरोबरच र्रतदाब व हृदयाचे कार्यही नियंत्रित राहते. म्हणूनच रोज सकाळ-संध्याकाळ फिरायला जाणे आवश्यक असते. आपल्या सर्वांगात स्फूर्ती, उत्साह व तरतरी आणण्यास
याचा खूपच उपयोगहोतो. चिडचिडेपणा, अकारण येणारा राग यावरही नियंत्रण राहते, ताठ, भराभरा व मान सरळ व ताठ ठेवून चालावे. पायही ताठ असावेत. चालताना देह पुढे झुकवू नये व गती समान ठेवावी, हे हत्त्वाचे. 
 
* खूप वेगाने व्यायाम केला की, काही वेळ कमी वेगाने व्यायाम करावा. म्हणजे कॅलरींचे ज्वलन वेगाने होते व शरीराचा मेटॅबोलिक रेटही वाढतो. तसेच जर एकूण व्यायाम तीस मिनिटे करणार असाल, तर पहिली दहा मिनिटे वेग मर्यादित ठेवावा. मग तो वाढवावा व त्यानंतर एक मिनीट कमी करावा. यामुळे शरीरास योग्य प्रकारे व्यायाम होतो.
 
* जर पायी चालणे होत नसेल तर जिना चढणे-उतरणे हा व्यायाम करावा. यामुळेही शरीरास श्रम पडून
चेतापेशी लवचिक व मजबूत बनतात व त्याची कार्यक्षमता वाढून वात कमी होतो. शरीरातील अनावश्क
चरबीही कमी होण्यास मदत मिळते. 
- शरयू वर्तक