गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated :नई दिल्ली/जिनेवा , शनिवार, 18 जुलै 2020 (22:42 IST)

Coronavirus Live Updates : जगभरात कोविड -19 मुळे 5.92 लाख लोकांचा मृत्यू, 1.38 कोटी संक्रमित

संपूर्ण जगात १३.६ कोटीपेक्षा जास्त नागरिक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. ५ लाख ६८ हजार रुग्णांचा कोरोना व्हायरसने बळी घेतला आहे तथा 1.38 कोटींपेक्षा जास्त लोक प्रभावित झाले आहेत. कोरोना व्हायरसशी संबंधित सर्व माहिती....

10:40 PM, 18th Jul
जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख पाटील होम क्वारंटाईन   
राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख पाटील हे होम क्वारंटाईन झाले आहेत. त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाले आहे. मंत्री शंकरराव गडाख पाटील यांनीच ही माहिती ट्विट करुन दिली आहे. गडाख यांच्या वाहन चालकाची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. 
 


08:02 PM, 18th Jul
 Corona Fighters : देवेंद्र फडणवीस यांचे डॉक्टर्स, परिचारिकांच्या वेतनप्रश्नी मुख्यमंत्र्यांना पत्र
विधानसभा विरोधी पक्षनेते (devendra fadnavis) देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाच्या संकटात निकराने लढणाऱ्या डॉक्टर्स आणि परिचारिकांच्या वेतनासंबंधी पुन्हा एकदा (CM Uddhav thackeray) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.


03:57 PM, 18th Jul
कोरोनाची सौम्य लक्षण असेलेल्या रुग्णांना घरी पाठवा’, पुणे मनपाचा निर्णय 
पुण्यामध्ये सामान्य कोरोना रुग्णांना उपचार मिळत नाहीत तर दुसरीकडे खासगी रूग्णालयांमधून अति सौम्यलक्षणं असलेले रूग्ण अकारण बेड्स अडवून बसल्याच्या तक्रारी आहेत. म्हणूनच खाजगी रुग्‍णालयांमध्‍ये कोरोनाबाधित म्‍हणून उपचारघेत असलेल्‍या तथापी, कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या किंवा सौम्‍य लक्षणे असलेल्‍या रुग्‍णांचे समुपदेशन करुन त्‍यांना घरी पाठवण्‍यात यावं, असे आदेश जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्थापन प्राधिकरणाचे अध्‍यक्ष नवल किशोर राम यांनी काढले आहे.

12:48 PM, 18th Jul
कोविड-१९ बाबतचे नियम पाळा, अन्यथा गुन्हे दाखल होणार - तुकाराम मुंढे
नागपूर येथे मिशन बिगीन अगेन अंतर्गत लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर  शासनाच्या दिशानिर्देशानुसार सर्व नियमांचे पालन करावे  या अटीवर दैनंदिन कामकाज सुरू करण्याची सवलत देण्यात आली. नियम तोडणाऱ्यांवर तात्काळ प्रभावाने साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत सरळ गुन्हे दाखल करण्यात यावे, असे निर्देश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहे.


12:33 PM, 18th Jul
कोल्हापूर : सोमवारपासून काय सुरू, काय बंद राहणार?
वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सोमवारपासून (दि. 20) सात दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पालकमंत्री सतेज पाटील (Guardian Minister Satej Patil)यांनी सांगितले. लॉकडाऊन काळात केवळ दूध, वर्तमानपत्रे आणि औषध विक्रीलाच परवानगी असेल. अन्य सर्व दुकाने, व्यवहार बंद राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. याचबरोबर जिल्ह्यातील बँका आणि शासकीय कार्यालयांबाबत आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडून अध्यादेश जारी केला जाण्याची शक्यता आहे.

09:39 AM, 18th Jul
जितेंद्र आव्हाड प्लाझ्मा दान करणार
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना करोनाची लागण झाली होती. आता रक्त चाचणीचे अहवाल सामान्य आल्यानंतर आव्हाड यांनी आता करोना रुग्णांसाठी प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला आहे.


08:41 AM, 18th Jul
Coronavirus in India: भारतात COVID-19 रुग्णांच्या संख्येने पार केला 10 लाखांचा टप्पा; 34,956
भारतात (India) कोरोनाने अक्षरश: धुमाकूळ घातला असून देशात कोरोना बाधितांच्या संख्येने आता 10 लाखांचा टप्पा पार केला आहे. आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry of India) दिलेल्या माहितीनुसार भारतात मागील 24 तासांत 34,956 कोरोनाचे (COVID-19) रुग्ण आढळले असून 687 रुग्ण दगावले आहेत. ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे. यामुळे देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 10,03,832 वर पोहोचली असून मृतांचा आकडा 25,602 वर पोहोचली आहे.