ठाणे : अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; ट्यूशन शिक्षकाला अटक  
					
										
                                       
                  
				  				   
				   
                  				  Thane News: महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात १७ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ट्यूशन शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे, असे एका अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले.
				  																								
									  
	 
	मिळालेल्या माहितीनुसार ५० वर्षीय आरोपी भाईंदरमध्ये खाजगी शिकवणी वर्ग घेत असे आणि त्याच परिसरातील पीडितेच्या घरी तिला शिकवण्यासाठी जात असे. त्याने प्रथम वर्षाच्या कला शाखेतील विद्यार्थिनीला तिच्या करिअरच्या वाढीबद्दल चर्चा करण्याचे बहाण्याने आमिष दाखवले आणि तिचा विनयभंग केला. नवघर पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीने पीडितेला ही घटना कोणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली.
				  				  
	 
	आरोपीने नंतर ऑक्टोबर २०२३ ते नोव्हेंबर २०२४ दरम्यान  त्याच्या घरी कोणीही नसताना अनेक वेळा पीडितेवर लैंगिक अत्याचार केला, असे अधिकाऱ्याने सांगितले. पीडितेने अलीकडेच तिच्या आईला सांगितले आणि नंतर दोघांनीही पोलिसांकडे धाव घेतली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी शनिवारी आरोपीला अटक केली. तसेच आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
				  											 
																	
									  				  																							
									  
	Edited By- Dhanashri Naik