शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 17 ऑगस्ट 2020 (09:51 IST)

Viral Video: बुरखाधारी महिलेने केला गणेशमूर्तीचा अवमान, गुन्हा दाखल

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओत एक बुरखा घातलेली माहिला एका सुपरमार्केटमध्ये गणपतीच्या मूर्ती खाली ढकलताना दिसत आहे. या व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून या प्रकरणात आता पोलिसांनी कारवाई केली असून महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
 
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका सुपरमार्केटमध्ये एक बुरखा घातलेली 54 वर्षीय माहिला गणपतीच्या मूर्ती ठेवलेल्या शेल्फजवळ येऊन आरडाओरड करते. आणि नंतर शेल्फवर ठेवलेल्या गणपतीच्या मूर्ती खाली ढकलते. ती अरबी भाषेत मुस्लमी देशात गणपतीच्या मूर्ती का विकल्या जात आहे असा आक्षेप घेत असल्याचे सांगितले जात आहे. यात ती म्हणताना दिसत आहे की हा मोहम्मद बीन इसाचा देश आहे. हा मुस्लीम देश आहे. बरोबर ना? मग त्यांना हे मान्य होईल असं तुम्हाला वाटतं का? दुकानदाराशी अशी हुज्ज्त घालत या मूर्तींची पूजा कोण करत बघू म्हणत मुरत्या खाली ढकलते. 
 
2010 च्या जनगणनेनुसार बहरीन येथील 9.8 टक्के लोकसंख्या ही हिंदू आहे. हा व्हिडिओ बहरीनमधील असून या प्रकरणी पोलिसांनी करावाईही केली आहे.