शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 7 जून 2020 (18:39 IST)

खाकी वर्दीत डान्स करणं दोन पोलीस शिपायांना पडलं महागात

टीकटॉकवर (tik tok) वर व्हायरल होण्यासाठी लोकं कोणत्याही थराला जातात. परंतू आता पोलिसांना देखील याचा चस्का लागल्यावर काय म्हणावं.
 
अलीकडे सपना चौधरीच्या गाण्यावर दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. पण याच टिकटॉकवर खाकी वर्दीत डान्स करणं दोन पोलीस शिपायांना चांगलंच महागात पडलं आहे. या व्हिडीओनंतर दोन्ही कर्मचाऱ्यांना पोलीस ठाण्यात सक्त ताकीद देण्यात आली.
 
हा‍ व्हिडिओ उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील गोला पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांचा असल्याची माहिती मिळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 
 
मात्र हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पोलीस शिपायी असलेल्या विवेक कुमार आणि प्रदीप कुमार या दोघांना सक्त ताकीद दिली आहे.