1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 1 जून 2020 (10:48 IST)

हार्दिक पांड्याकडे Good News, लहान पाहुणा घरी येणार

टीम इंडियाचा क्रिकेटर हार्दिक पांड्याने जानेवारीत बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकसोबत साखरपुडा झाल्याची बातमी देऊन सर्वांना चकित केले होते. या दोघांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर खूप व्हायल देखील झाले होते. 
 
आता पुन्हा दोघे चर्चेत आले आहे. हार्दिक पांड्याने लवकरच लहान पाहुणा त्यांच्या घरी येणार असल्याचे आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर जाहीर केले आहे. नताशाने हार्दिक पांड्याबरोबरची काही छायाचित्रे शेअर केली आहेत, त्यातील एका फोटोत तिचं बेबी बंपही दिसतं आहे.
 
पुन्हा एकदा या दोघांचेही एक छायाचित्र खूप चर्चेत आहे. फोटोमध्ये हार्दिक आणि नताशा दोघेही पारंपारिक पोशाखात दिसत असून दोघेही पूजा करीत असताना दिसत आहेत. त्यांच्या गळ्यात फुलांचा हार असल्यामुळे नेटकर्‍यांनी त्यांच्या लग्नाची शक्यता व्यक्त केली आहे.