बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: दुबई , शनिवार, 30 मे 2020 (12:52 IST)

विश्वचषकाचे यजमानपद काढून घेऊ

भारतात 2021 मध्ये होणार्याव टी-20 विश्वचषकाचे यजमानपद  काढून घेण्याचा इशारा आयसीसीने दिला आहे. 
आयसीसी स्पर्धेदरम्यान करात सूट मिळण्यासाठी बीसीसीआयसोबत 2016 पासून वाद सुरू आहे. 17 एप्रिलपर्यंत मंडळाला त्याबाबत आयसीसीला माहिती द्यायची होती. मात्र, 24 मार्चपासून लॉकडाउन असल्याने 30 जूनपर्यंत वेळ मागितला होता. बीसीसीआयने सरकारला 6 पत्रे लिहून ही बाब कळवली. आयसीसीचे जोनाथन हॉलने पत्र लिहून म्हटले, अनेक वर्षांपासून बीसीसीआयकडे हे प्रकरण सोडवण्याची संधी होती. तुम्ही पाऊल उचलले नाही. 
 
आयसीसीची आज टेलीकॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होत आहे. यात ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होणार्या टी-20 विश्वचषकावर चर्चा होईल. स्पर्धेला 2022 पर्यंत स्थगित केले जाऊ शकते. मात्र, त्यावर अखेरचा निर्णय जूनमध्ये होण्याची शक्यता आहे. आयसीसीच्या एका सदस्याने म्हटले की, बैठकीत विश्वचषक स्थगित होण्याची शक्यता आहे. त्याची घोषणा होईल की नाही केवळ हा प्रश्न आहे. विश्वचषक स्थगित केला गेल्यास ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयपीएलचे आयोजन होऊ शकते.
 
बीसीसीआयने कराच्या प्रकारात गंभीर नाही अशा आयसीसीच्या प्रतिक्रियेला अमान्य केले. एका अधिकार्यााने म्हटले की, आम्ही आयसीसीला सरकारशी चर्चा केलेल्या पत्रासंबंधी माहिती दिली.